परिसरातील इमारतीच्या टेरेसवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकत ८ जणांना पकडले. या कारवाईत १६ हजार ६८० ची रोकड, ६० हजाराचे ५ मोबाईल असा ७६ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अरविंद माने यांनी फिर्याद दिली आहे.
किसान चौकात परिसरात असलेल्या अजित जाधव यांच्या मालकीच्या इमारतीच्या टेरेसवर तीनपानी जुगार सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीवरून छापा टाकला असता त्याठिकाणी आतिश रणजित माळी (वय ३५), राहुल सखाराम माळी (वय ३५), आकाश अशोक जाधव (वय ३७), राजेश सायबु जाधव (वय ५४ सर्व रा. गोसावी गल्ली), संजय वसंत शिंदे (वय ४९), अजित शंकर जाधव (वय ४४ सर्व रा. कलानगर), अरमान अरीफ मोमीन (वय ३२ रा. थोरात चौक), राजेंद्र शंकर भिसे (वय ५० रा. बंडगरमाळ) हे आठजण जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी ६० हजार रूपये किंमतीचे ५ मोबाईल व १६ हजार ६८० ची रोकड असा ७६ हजार ६८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
