एलोन मस्क हे आता इंटरनेट क्षेत्रात उतरले आहेत. त्यांची कंपनी स्टारलिंक लवकरच भारतात आपली सेवा सुरू करणार आहे. यासाठी कंपनीने नऊ भारतीय शहरांमध्ये सॅटलाईट बेस स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. स्पेसएक्सने 28 उपग्रह अवकाशात सोडले आहेत. फाल्कन 9 रॉकेट वापरून हे उपग्रह अवकाशात पाठवण्यात आले असून याद्वारे जगभरात इंटरनेट सेवा पूरविली जाणार आहे. आता या कंपनीची सेवा भारतात कधी सुरू होणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
स्टारलिंक भारतात सेवा सुरू करणार
आतापर्यंत एलोन मस्क यांच्या कपनीने 10 हजार स्टारलिंक उपग्रह अवकाशात सोडले आहेत. याद्वारे जगातील कानाकोपऱ्यात इंटरनेट सेवा देण्याची तयारी आहे. आतापर्यंत कंपनीने 10 पेक्षा जास्त देशांमध्ये उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा देण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता कंपनी भारतात देखील आपली सेवा सुरू करणार आहे. स्टारलिंकला भारतात आपली सेवा सुरू करण्यासाठी नियामक परवानगी मिळाली आहे.
सेवा कधी सुरू होणार?
समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रायने स्पेक्ट्रम वाटप प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्टारलिंकची उपग्रह इंटरनेट सेवा सुरू केली जाणार आहे. या वर्षाच्या अखेरीस ही इंटरनेट सेवा सुरू करण्याची अपेक्षा आहे. या इंटरनेट सेवेसाठी मस्क यांची कंपनी नऊ शहरांमध्ये गेटवे अर्थ स्टेशन म्हणजे उपग्रह बेस स्टेशन बांधण्याची योजना राहवत आहे. हे बेस दिल्लीजवळील नोएडा, लखनऊ, हैदराबाद, कोलकाता, चंदीगड आणि मुंबई यांसारख्या तयार केले जाणार आहेत.
नेटवर्क नसेल तरीही कॉल करता येणार
स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर युजर्स मोबाइल नेटवर्क नसेल तरीही कॉलिंग आणि इंटरनेट वापरू शकणार आहेत. स्टारलिंकने गेल्या वर्षी डायरेक्ट-टू-सेल तंत्रज्ञानाची चाचणी केली होती, यात नेटवर्कशिवाय कॉल करणे शक्य असल्याचे समोर आले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता कॉलिंग सुविधा दिली जाणार आहे. अडचणीच्या काळात ही सेवा फायदेशीर ठरणार आहे.
एलोन मस्क यांच्या स्टारलिंकची डायरेक्ट-टू-सेल सेवा युजर्न मोबाइल फोनद्वारे वापरू शकणार आहेत. यासाठी कोणताही विशेष हार्डवेअर आवश्यक असणार नाही. याआधी स्टारलिंकने बेस स्टेशन चालवण्यासाठी परदेशी तज्ञ नियुक्त करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता, मात्र भारत सरकारने स्टारलिंकला सांगितले की, गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळेपर्यंत भारतीय नागरिकच स्टेशनची देखरेख करतील.




