Saturday, November 1, 2025
Homeकोल्हापूरउदगाव येथे पार्टीसाठी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा डोके ठेचून खून

उदगाव येथे पार्टीसाठी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा डोके ठेचून खून

उदगाव (ता. शिरोळ) येथे असलेल्या कृष्णा नदीच्या पात्रालगत रविवारी दुपारी तीनच्या सुमारास तरुणाचा खून झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लखन सुरेश घावट उर्फ बागडी (वय ३५, रा. जयसिंगपूर) असे मयताचे नाव असून, त्याच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याचा निघृण खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान मृतदेह रक्ताच्या थारोळ्यत पडल्याने

 

उदगाव घाटावर भयान वातावरण पसरले होते.

 

मिळालेल्या माहितीनुसार, लखन घावट हा आपल्या काही मित्रांसोबत उदगावला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळील नदी पात्रात पार्टीसाठी गेला होता. पार्टीदरम्यान किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले आणि त्यात एका साथीदाराने लखनच्या डोक्यावर दगडाने जबर प्रहार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

 

जयसिंगपूर परिसरात अलिकडच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांत आधीच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ४ दिवसांपूर्वीच गल्ली क्रमांक १३ मध्ये सुनील पाथरवट यांच्या खुनाची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा लखन घावटच्या खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच उदगाव येथे पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी तपासाचे चक्र वेगात फिरवले आहे. खुनाचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -