Monday, November 24, 2025
Homeक्रीडायुजवेंद्र चहलचा टी20 क्रिकेटमधील मोठा विक्रम बुमराहने मोडला, पण…

युजवेंद्र चहलचा टी20 क्रिकेटमधील मोठा विक्रम बुमराहने मोडला, पण…

ऑस्ट्रेलियाने भारताला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसर्‍या सामन्यात 4 विकेट्सने पराभूत केलं. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठछी फक्त 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात 2 विकेट घेत जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम नावावर केला.

 

जसप्रीत बुमराहने या सामन्यात 4 षटकात 26 धावा देत 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने स्पेलच्या शेवटच्या षटकात दोन गडी बाद करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्यासह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर युजवेंद्र चहलचा विक्रम मोडीत काढला आहे.

 

भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच मान अर्शदीप सिंगच्या नावावर आहे. त्याने 65 सामन्यात 101 विकेट घेतल्या आहेत. आता बुमराह दुसऱ्या स्थानावर असून त्याने 77 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या नावावरही 98 विकेट आहेत. तर युजवेंद्र चहलने 80 सामन्यात 96 विकेट घेतल्या आहेत.

 

जसप्रीत बुमराहला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पण या सामन्यातही त्याला खातं न खोलता तंबूत परतावं लागलं. यासह त्याने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अनिल कुंबळेला मागे टाकलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -