Thursday, November 13, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आदिती तटकरेंची मोठी घोषणा, ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आदिती तटकरेंची मोठी घोषणा, ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना उद्या म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता दिला जाणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावं असंही त्यांनी सांगितलं आहे.

 

आदिती तटकरेंनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?

 

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे,” असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.

 

“महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती,” असंही त्यांनी लिहिलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -