Wednesday, November 12, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत पुरवठा कार्यालयात आग

इचलकरंजीत पुरवठा कार्यालयात आग

येथील पुरवठा कार्यालयात पत्रे बसवण्याचे काम सुरू असताना वेल्डिंग कामावेळी पडलेल्या ठिणगीमुळे कार्यालयात आग लागली. यावेळी कार्यालयात विविध ठिकाणी झालेल्या कारवाईमध्ये जप्त केलेले 51 सिलिंडर होते.

 

त्यामध्ये भरलेले सिलिंडरही असल्याने भागातील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत राबवलेल्या मदतकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

 

महात्मा गांधी पुतळा परिसरात पुरवठा कार्यालय आहे. कार्यालयाच्या मागील बाजूस पत्र्यांना वेल्डिंग करून ते बसवण्यात येत होते. यावेळी ठिणग्या कागदाच्या गठ्ठ्यांवर पडल्याने आग लागली. नागरिकांनी सतर्कता दाखवली. या ठिकाणी साठा करून ठेवण्यात आलेले सिलिंडर तातडीने हलवण्यात आले. घटना घडलेल्या कार्यालयाच्या भिंतीलगतच अपर पोलिस अधीक्षक कार्यालय आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आल्यामुळे अनर्थ टळला. याबाबतची माहिती मिळताच प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. संबंधित गॅस कंपन्यांकडे सिलिंडर तातडीने सोपवण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -