Thursday, November 13, 2025
Homeक्रीडाभारताचा डाव पहिल्याच दिवशी 255 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची नाबाद 132 धावांची...

भारताचा डाव पहिल्याच दिवशी 255 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची नाबाद 132 धावांची खेळी

इंडिया ए विरूद्धच्या सामन्यात दक्षिण अफ्रिका ए संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामना जिंकून दक्षिण अफ्रिका एक संघ मालिका बरोबरीत सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. भारताने या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या दिवशी भारताने 77.1 षटकात सर्व गडी गमवून 255 धावा केल्या. या सामन्यात मधल्या फळीत ध्रुव जुरेल वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याच्या नाबाद 132 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 255 धावांपर्यंत मजल मारली. तर तीन फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांना झटपट बाद करण्याचं आव्हान असणार आहे.

 

दुसऱ्या षटकात अभिमन्यू ईश्वरनच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्याला खातंही खोलता आलं नाही. संघाच्या अवघ्या 2 धावा असताना पहिला धक्का बसला. त्यानंतर केएल राहुल आणि साई सुदर्शन यांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. पण ही भागीदारी फक्त 35 धावांची झाली आणि केएल राहुल 19 धावा करून बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन 17 धावा करून तंबूत परतला. देवदत्त पडिक्कलही काही खास करू शकला नाही. फक्त 5 धावा करू शकला. कर्णधार ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण ऋषभ पंत 24 धावा करून बाद झाला. अवघ्या 86 धावांवर टीम इंडियाचा निम्मा संघ तंबूत होता.

 

ध्रुव जुरेल आणि हर्ष दुबे या जोडीने धावा जोडण्याचा प्रयत्न केला. या जोडीने सहाव्या विकेटसाठी 47 चेंडूत 33 धावांची खेळी केली. त्यानंतर आकाश दीप आला आणि आला तसाच गेला. त्याला खातंही खोलता आलं नाही. 126 धावांवर 7 गडी अशी स्थिती टीम इंडियाची होती. अशा स्थितीत कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल यांनी 173 चेंडूंचा सामना करत 79 धावा केल्या. कुलदीप यादव 20 धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराज आणि ध्रुव जुरेल यांची 34 धावांची भागीदारी झाली. सिराज 15 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा फलंदाजीला आल्याने ध्रुव जुरेलने जास्तीत जास्त स्ट्राईक स्वत:जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला. 16 धावा त्याने यावेळी केली. पण प्रसिद्ध कृष्णाला स्ट्राईक मिळाली आणि 4 चेंडूचा सामना करत शून्यावर बाद झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -