Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रकिरकोळ कारणावरून दोघा भावांच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

किरकोळ कारणावरून दोघा भावांच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

किरकोळ कारणावरून दोघा जणांनी दोघा भावांच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. त्यांच्याकडील हत्यारांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police) दोघांना अटक केली आहे.

 

मयूर सुरेश कुडले Mayur Suresh Kudle (वय २६, रा. वारजे), आदित्य नाना जौजाळ Aditya Nana Jaujal ( वय २२, रा. वारजे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

याबाबत जयवंत दिनकर मिसाळ ( वय ४५, रा. रामनगर, वारजे) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना वारजे पुलाखालील राजे शिवबा रिक्षा स्टँड समोर १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजता घडली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ महेश तेथे उभे होते. आरोपी हे कुरियरचे काम करतात. ते वारजे पुलाखाली आले व त्यांनी फिर्यादी व त्यांचा भाऊ महेश यांना विनाकारण लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेथे पडलेला दगड उचलून महेश यांच्या डोक्यात घालून जखमी केले. त्यांनी हत्यार काढून फिर्यादी यांना धमकावले. त्यांच्या मुलीच्या कानाखाली मारली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उप निरीक्षक अर्जुन नाईकवडे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -