Thursday, November 27, 2025
Homeक्रीडास्मृती मानधना-पलाश मुच्छलचा पुन्हा जंगी विवाह? चॅट लिक प्रकरणानंतर मोठी अपडेट समोर!

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचा पुन्हा जंगी विवाह? चॅट लिक प्रकरणानंतर मोठी अपडेट समोर!

क्रिकेटर स्मृती मानधनाचे 23 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न होणार होते. परंतु लग्नाच्या काही तास अगोदर स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि हा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर स्मृतीचा होणारा नवरा पलास मुच्छल याचीही प्रकृती बिघडली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता. सध्या त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच स्मृतीला अंधारात टेवून पलाश मेरी डिकॉस्टा नावाच्या मुलीशी चॅटिंग करत होता, असा दावा केला जातोय. तसे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. पलाश मेरीला भेटायलाही बोलवत होता, असा दावा या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून केला जात आहे. असे असतानाच आता पलाश आणि स्मृतीच्या लग्नाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच त्या दोघांचं लग्न होणार आहे, असे पलाशच्याच नात्यातील एका व्यक्तीने सांगितले आहे.

 

चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका

स्मृती आणि पलाश यांचा विवाह सोहळा पुन्हा एकदा आयोजित केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे तसे संकेत पलाशच्याच कुटुंबातील एका व्यक्तीने दिले आहेत. नीती टाक ही पलाश मुच्छल याची नातेवाईक आहे. तिनेच आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर स्टोरीच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. याआधी तिने एक स्टोरी ठेवून पलाश आणि मेरी डिकॉस्टा यांच्याविषयी चालू असलेल्या चर्चेवर भाष्य केलं होतं. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. पलाश सध्या नाजूक परिस्थितीतून जात आहे. कोणतेही सत्य माहिती नसताना पलाशला कोणीही चुकीचे ठरवू नये, असे नीतीने म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा नवी इन्स्टा स्टोरी टाकून पलाश आणि स्मृतीच्या लग्नाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

 

पुन्हा होणार स्मृती-पलाशचा विवाह सोहळा

पलाश आणि स्मृती मानधना यांचा 23 नोव्हेंबर रोजीचा विवाह सोहळा रद्द करण्यात आला. आता पलाश तसेच स्मृती मानधना हिचे वडील अशा दोघांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. त्यामुळे या स्मृती आणि पलाश यांचा विवाह नेमका कधी होणार? असा प्रश्न केला जात होता. याच विवाहाबाबत नीतीने काही संकेत दिले आहेत. नीतीने आपल्या ईन्स्टा स्टोरीवर पलाश आणि स्मृती यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये स्मृती आणि स्मृतीच्या वडिलांचाही फोटो आहे. यासह तिने चॅट लिक झालेल्या फक्त अफवा आहेत. कोणीही अफवा पसरवू नये. स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती आता चांगली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल लवकरच लग्न करणार आहेत, असे नीती टाक हीने आपल्या इन्स्टा स्टोरीत म्हटले आहे

 

दरम्यान, हे लग्न नेमके कधी होणार, याबाबत मात्र नीती टाकने काहीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय-काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -