देशातील ऑटो बाजारात एकीकडे इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या (available) किमतीत सातत्याने वाढ होत असतानाच दुसरीकडे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहेत. हीच वाढती मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्यांनी मार्केटमध्ये दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या आहेत. मात्र, यात खूप कमी कार ग्राहकांच्या आवडत्या कार ठरल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे MG Windsor EV एमजी मोटर्स इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एमजी विंडसर ईव्ही ऑफर करते. या महिन्यात या कारवर हजारो रुपयांची सूट मिळत आहे.
ऑफर्समध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलतींचा समावेश आहे. (available)या महिन्यात या कारच्या कोणत्या व्हेरिएंटवर किती बचत मिळू शकते, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.रिपोर्टनुसार, या कारचा बेस व्हेरिएंट म्हणून 38 kWh बॅटरी व्हेरिएंट उपलब्ध आहे. या महिन्यात हा व्हेरिएंट खरेदी केल्यास एकूण 65 हजार रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते. यामध्ये 30 हजार रुपयांचे कॅश डिस्काउंट, 25 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस समाविष्ट आहे.53 kWh बॅटरीसह कारचे Pro व्हेरिएंट्स ऑफर केले जातात.
या व्हेरिएंट्सवर कंपनीकडून एकूण 30 हजार रुपयांची सवलत दिली जात आहे.(available) यात 20 हजार रुपयांचे कॅश डिस्काउंट आणि 10 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस समाविष्ट आहे.कंपनीकडून ही कार भारतात 12.65 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत ऑफर केली जात आहे. 38 kWh व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 17.73 लाख रुपयांपर्यंत आहे. तर Pro व्हेरिएंट्सची एक्स-शोरूम किंमत 18.73 लाख रुपये ते 19.34 लाख रुपयांदरम्यान आहे





