Friday, January 16, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजीत पोलिसांचे पथसंचलन; महापालिका निवडणुकीपूर्वी शहरात कडेकोट बंदोबस्त

इचलकरंजीत पोलिसांचे पथसंचलन; महापालिका निवडणुकीपूर्वी शहरात कडेकोट बंदोबस्त

महापालिका निवडणुकीचा प्रचार संपण्याआधी पोलिसांनी सतर्कतेचा इशारा देत (security) शहरातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन केले. मतदान व मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सुमारे ८०० पोलिस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. हा बंदोबस्त शहरातील ३०२ मतदान केंद्रांवर वाटप केला आहे. प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याची स्वतंत्रपणे नियुक्ती करून त्यांना ठराविक बंदोबस्ताचे ठिकाण दिले आहे.

 

शहरात संवेदनशील मतदान केंद्रे नसली, तरी खबरदारीचा उपाय (security)म्हणून ७४ मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. मतदान साहित्य वाटपापासून ते प्रत्यक्ष मतदान व त्यानंतर होणाऱ्या मतमोजणीपर्यंतच्या तीन दिवसांच्या कालावधीत वेब कास्टिंगद्वारे सतत पोलिसांचे नियंत्रण राहणार आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस कर्मचारी व एक गृहरक्षक जवान, असे दोन कर्मचारी तैनात असतील. ज्या इमारतींमध्ये तीन ते चार मतदान केंद्रे आहेत, त्या ठिकाणी १०० मीटर अंतरावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

 

तसेच मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेता विभागनिहाय पेट्रोलिंग करत(security) फिरत्या पथकांद्वारे केंद्रांवर पोलिसांचा वॉच राहणार आहे. दरम्यान, निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातून सुमारे १६५ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हातकणंगले तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.मतदानाच्या दिवशी मर्यादित राखीव कालावधी वगळता त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी गुन्हे शोध पथकासह अतिरिक्त पथके कार्यरत राहणार आहेत. एकूणच शांततापूर्ण व निर्भय वातावरणात मतदान पार पडावे, यासाठी पोलिस प्रशासनाने काटेकोर नियोजन केले असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -