Friday, January 23, 2026
Homeमहाराष्ट्रआनंदाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार दीड...

आनंदाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार दीड लाख रुपयांची थकबाकी !

नोव्हेंबरमध्ये सरकारने नव्या आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली. त्याआधी याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती.यासाठी तीन सदस्य समितीची स्थापना झालीये.

 

थकबाकीचा लाभ मिळणार

 

एप्रिल 2027 मध्ये रिपोर्ट सरकारला मिळणार आहे. त्यानंतर मग या अहवालावर सरकारकडून विचार होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या आयोगाची भेट मिळणार आहे.

 

मे 2027 किंवा 2028 च्या सुरुवातीला नवीन वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होणार आहे. नव्या आयोगाचा प्रत्यक्षात लाभ कधीही मिळाला तरी देखील हा आयोग 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी राहील. म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या आयोगाची थकबाकी सुद्धा मिळणार आहे.

 

दीड लाख रुपयांची थकबाकी मिळणार !

 

नवा वेतन आयोग मे 2027 मध्ये लागू होण्याची एक शक्यता आहे. नव्या आयोगात चाळीस हजार रुपये पगार असणाऱ्याला 10 हजार रुपये वेतनवाढ मिळणार असा अंदाज आहे.

 

आता हा अंदाज खरा ठरला तर मे 2027 मध्ये सदर कर्मचाऱ्यांना 15 महिन्यांची एकूण दीड लाख रुपये थकबाकी सुद्धा मिळणार आहे.

 

पण नव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर नुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा पगार वाढणार आहे. यामुळे नव्या आयोगात कर्मचाऱ्यांसाठी लागू असणारा फिटमेंट फॅक्टर नेमका किती वाढणार हे पाहण्यासारखे ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -