Friday, January 23, 2026
Homeकोल्हापूरनिकालानंतर कोल्हापुरात तुफान हाणामारी, पोलिसांसमोरच महिला एकमेकांच्या अंगावर धावल्या

निकालानंतर कोल्हापुरात तुफान हाणामारी, पोलिसांसमोरच महिला एकमेकांच्या अंगावर धावल्या

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहरातील काही भागांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. प्रभाग क्रमांक ४ मधील कणानगर परिसरात निकालानंतर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी व दगडफेकीचा प्रकार घडला.

 

या घटनेत दिलीप पवार आणि मयूर पवार समर्थक गट आमनेसामने आले.

 

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटांतील समर्थकांमध्ये वादाला सुरुवात झाली. हा वाद काही वेळातच उग्र रूप धारण करत दगडफेकीत परिवर्तित झाला. विशेष म्हणजे, या गोंधळात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. काही महिलांनी एकमेकींवर धावून जाण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी पाण्याच्या बाटल्या फेकल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलांची संख्या अधिक असल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण राहिली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कोणताही मोठा अनुचित प्रकार होऊ दिला नाही.

 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात काही किरकोळ प्रकार वगळता मतमोजणी प्रक्रिया एकूण शांततेत पार पडली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मात्र, कणानगरमधील या घटनेमुळे निवडणुकीनंतरच्या वातावरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

दरम्यान, घटनेप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -