राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला आहे. आज सकाळी 9 च्या सुमारास झालेल्या या घटनेत अजित पवारांसह विमानचे पायलट आणि इतर सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवाराच्या निधनावर खासदार आणि अजित पवार यांचे काका शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. एक मेहनती नेता आपल्यातून गेल्याने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याचं जे नुकसान झालंय ते भरून येण्यासारखं नाहीये. आजही काही गोष्टी आपल्या हातात नाहीत. मी आज सकाळी विनायकरावांना भेटलो. काही दुष्ट शक्ती या अपघातामागे राजकारण तर नाही ना? अशा प्रकारची विधानं जाणूनबुजून करत आहेत. यात काहीही राजकारण नाही. हा केवळ एक अपघात होता. याच्या यातना महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना आहे, यात राजकारण आणू नये असंही शरद पवार म्हणाले.
निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया…
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -






