Tuesday, February 10, 2026
Homeकोल्हापूरबंदोबस्तासाठी बाहेरगावी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे घर फोडले, तब्बल 21 तोळे सोने चोरीला

बंदोबस्तासाठी बाहेरगावी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे घर फोडले, तब्बल 21 तोळे सोने चोरीला

बंदोबस्तासाठी बाहेरगावी गेलेल्या पोलिसाच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने २५ लाख रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना काल सकाळी उघडकीस (Police House Burglary) आली.

 

भादोले (ता. हातकणंगले) येथे वाठार मार्गावर पोलिस कर्मचारी सोमनाथ लखू माने पत्नीसह राहण्यास आहेत. सोमनाथ हे जालना येथे बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांना घेऊन येण्यासाठी गेले होते. तर पत्नी बुधवारी (ता. ४) माहेरी गेल्या होत्या. सोमनाथ जालन्याहून गुरुवारी सकाळी घरी परत आले.

 

यावेळी घराचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घरात प्रवेश केला असता बेडरूममधील कपाटातील साहित्य विस्कटलेल्या अवस्थेत होते. त्यांनी पाहणी केली असताना कपाटातील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. या चोरीमध्ये सोन्याच्या चार बांगड्या, एक नेकलेस, दोन चेन, लक्ष्मी हार, मंगळसूत्र, तीन अंगठ्या, कानातील साखळ्या, नथ, ब्रेसलेट, दोन जोडी चांदीचे पैंजण, जोडवी दोन असे २१ तोळे दागिने चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -