Thursday, May 21, 2026
Homeकोल्हापूरदामदुप्पट परतावा आमिषाने 65 लाखांची फसवणूक

दामदुप्पट परतावा आमिषाने 65 लाखांची फसवणूक

गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणुकारांची 64 लाख 98 हजार 897 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील ताराराणी चौकातील टीजेडब्लू लर्निंग सोल्युशनसह सलग्न कंपन्यांचे प्रमुख समीर सुभाष नार्वेकर (रा.माणगाव, जि. रत्नागिरी) याच्यासह 6 जणांविरूध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताच्या अटकेसाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत.

 

वीणा नितीन लकडे (वय 42, रा. पुईखडी, राधानगरी रोड, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली. समीर नार्वेकरसह नेहा समीर नार्वेकर, चिन्मय पालकर, विजय तपाडे (रा. श्वेता अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर), निखिल सुर्वे (शेख बंगलो, वालावलकर हायस्कूलजवळ, मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर), अमित बालम अशी नावे आहेत. मुख्य सूत्रधार समीर नार्वेकर, पत्नी नेहासह संचालकांनी 2023 ते दि.21 मार्च 2025 काळात राणाराणी चौक परिसरात टीजेडब्ल्यू लर्निंग सोल्यूशनसह संलग्न कंपनीचे कार्यालय थाटले.

 

कंपनीमार्फत शहर, जिल्ह्यासह कर्नाटकात सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. वीणा लकडे यांनी 17 लाखांची गुंतवणूक केली. याशिवाय 9 गुंतवणूकदारांनी एकूण 64 लाख 98 हजार 897 रुपयांची कंपनीकडे गुंतवणूक केली.मुदतीनंतर परतावा मिळण्यासाठी गुंतवणूकदारांनी तगादा लावताच सूत्रधारासह संचालक कंपनी कार्याललयाला टाळे ठोकून पसार झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -