Saturday, May 23, 2026
Homeइचलकरंजीजयसिंगपुरात भरदिवसा तरुणाचा खून; मित्रानेच केला 'गेम', शहरात खळबळ

जयसिंगपुरात भरदिवसा तरुणाचा खून; मित्रानेच केला ‘गेम’, शहरात खळबळ

पूर्ववैमनस्यातून तसेच व्हॉट्सॲप ग्रुपवरील कमेंटमुळे निर्माण झालेल्या वादातून जयसिंगपूर येथे साहिल झाकीर काझी (वय २९, रा.गल्ली नं. तेरावी गल्ली, मच्छी मार्केटजवळ, जयसिंगपूर) या तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. गुरुवारी (ता. २१) दुपारी तीनच्या सुमारास पोस्ट ऑफिसलगत घडली.

 

मृत असिफचा भाऊ आसिफ झाकीर काझी यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी राजू लक्ष्मण कांबळे (रा. शाहूनगर, समडोळी मळा, जयसिंगपूर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, मृत साहिल आणि आरोपी राजू कांबळे यांच्यात गाडीच्या कर्जाचे हफ्ते भरण्यावरून जुना वाद होता.

 

याच वादाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲप ग्रुपवर काही कमेंट्स करण्यात आल्या होत्या. या कमेंटचा राग मनात धरून आरोपी राजूने साहिलला आणि त्याचा मित्र कार्तिक कलकुटगी याला मैदानावर चर्चेसाठी बोलावले.

 

मैदानावर चर्चा सुरू असताना वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी संतापलेल्या राजूने आपल्या जवळील चाकूने साहिलच्या छातीवर डाव्या बाजूस आणि डाव्या दंडावर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला साहिल रक्ताच्या थारोळ्यात पडला.

 

तर आरोपी तिथून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या साहिलला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र जखम खोल असल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी, घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, पोलीस उपनिरीक्षक माने या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.भरदिवसा घडलेल्या या खुनाच्या घटनेने जयसिंगपूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -