Tuesday, May 26, 2026
Homeकोल्हापूरवडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं...

वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

वडील आणि भावानेही गाडीवरून कॉलेजला सोडले नसल्याच्या कारणावरून आज विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. साईराज पांडुरंग हुंबे (वय १८, रा. आयडियल कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

 

शहरातील एका महाविद्यालयात तो ‘सिव्हिल डिप्लोमा’च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. याची नोंद सीपीआर पोलिस चौक, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली.

 

पोलिसांनी सांगितले की, वडील पांडुरंग हुंबे हे लक्षतीर्थ वसाहतीत कुटुंबीयांसह राहतात. माळी काम करतात. साईराज त्यांचा तीन नंबरचा मुलगा. कालरात्रीच त्याने दुचाकीवरून कॉलेजमध्ये सोडण्याची विनंती वडिलांना केली होती. मात्र, आज सकाळी तो लवकर उठला नाही. अखेर नऊच्या सुमारास वडील दुचाकी घेऊन कामासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर उठलेल्या साईराजने वडिलांना फोन केला. त्यांच्या नकारानंतर मोठ्या भावालाही फोन केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

 

त्या नैराश्‍येतून त्याने बेडरूमचा दरवाजा बंद करून छताच्या फॅनला वायरने गळफास घेतला. साईराज बराच वेळ खोलीतून बाहेर आला नाही. वारंवार आवाज देऊनही काही प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाइकांनी दरवाजा तोडून पाहिले असता, त्याने घरातील छताच्या पंख्याला वायरने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यानंतर नातेवाइकांनी गळफास सोडून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. दरम्यानच्या काळात त्याचा मृत्यू झाला होता.

 

तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यामुळे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी स्वतः तपासात लक्ष घातले. त्यांनी सीपीआरसह त्यांच्या राहत्या घरी भेट दिली. त्याच्या आत्महत्‍येचे नेमके कारण काय, याबाबत प्राथमिक तपास केला. अखेर वडील आणि भावाने साईराजला कॉलेजला गाडीवरून सोडले नसल्याच्या नैराश्‍येतून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मागे आई, वडील, मोठी बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -