Sunday, May 31, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापुरात पोर्णिमेच्या रात्री महादेव मंदिरातील पिंडीवर रक्ताची धार, अघोरी प्रकाराचा कळस, ग्रामस्थांकडून...

कोल्हापुरात पोर्णिमेच्या रात्री महादेव मंदिरातील पिंडीवर रक्ताची धार, अघोरी प्रकाराचा कळस, ग्रामस्थांकडून तीव्र निषेध

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याच्या नानीबाई चिखली येथील कुरली बंधाऱ्यानजीक पुरातन असे संगमेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिरात असलेल्या पिंडीवर अज्ञात व्यक्तीकडून रक्ताची धार सोडण्यात आली आहे.

 

आज (ता.३१)सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पौर्णिमेच्या रात्री घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह मुरगुडचे पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

 

वेदगंगा, चिकोत्रा नदीच्या संगमाजवळ असलेल्या या संगमेश्र्वर महादेव मंदिराबद्दल ग्रामस्थांमध्ये सुरवातीपासूनच विशेष अशी श्रध्दा आहे. अलीकडच्या काळात तर येथे दरवर्षी पौष अमावस्येला विशालतीर्थ यात्रा भरवली जाते. या विशालतीर्थ यात्रेची व्याप्ती वाढत असून त्याचे महात्म्य देखील वाढले आहे.

 

त्यामुळे अशा या संगमेश्वर महादेव मंदिरात घडलेला अघोरी प्रकार संतापजनक असाच आहे. पौर्णिमेला मध्यरात्री अज्ञात इसमाकडून हा अघोरी प्रकार करण्यात आला असल्याची चर्चा आहे. आज रविवार (ता. ३१) रोजी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी सकाळी ६ वाजता येणाऱ्या एका भाविकाला हा प्रकार नजरेस पडला. त्याने ही घटना पुजारी तसेच ग्रामस्थांना सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली.

 

नानीबाई चिखली ग्रामस्थांच्या श्रध्देला ठेच पोहोचविणाऱ्या अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्यक्त होत असून ग्रामस्थांकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -