Wednesday, June 3, 2026
Homeमहाराष्ट्रसुरतमध्ये भीषण अपघात, दोन बस समोरासमोर धडकल्या; धडकेनंतर बसने घेतला पेट, ८...

सुरतमध्ये भीषण अपघात, दोन बस समोरासमोर धडकल्या; धडकेनंतर बसने घेतला पेट, ८ जणांचा जागीच मृत्यू

धडकेनंतर एक बस उलटून पेट घेतल्याने भीषण दुर्घटना घडली.प्राथमिक माहितीनुसार ७ ते ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरत जिल्ह्यातील बारडोलीमधील उवा गावाजवळ भीषण अपघात झाला.

महाराष्ट्रातील दोन प्रवासी लक्झरी बसेसची समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर बस उलटली आणि तिने पेट घेतला. प्राथमिक अहवालानुसार, या भीषण अपघातात ७ ते ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर अनेक जण गंभीर जखमी झाल्याचा संशय आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, उवा गावाजवळून जाणाऱ्या महाराष्ट्रातील दोन प्रवासी बसेसची धडक झाली. धडकेनंतर एक बस रस्त्यावर उलटली. बस उलटल्यानंतर बसला आग लागली. या भीषण अपघातानंतर परिसरात किंचाळ्यांनी दणाणून उठला. अपघातात बसचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -