पंतप्रधान निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी टीका केली आहे. त्यांनी राहुल गांधींवर विद्यार्थ्यांचा राजकीय शस्त्रासारखा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांसाठी तोडगा काढणं हा काँग्रेसचा उद्देश नाही. राजकारण करुन अशांततात पसरवण्याचा उद्देश आहे असा आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पोहोचले
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पोहोचले आहेत. त्यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.



