सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनला अखेर यश आलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा घेतला आहे. शुक्रवारी मध्यरात्री जे.पी. नड्डा यांनी रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घेतली.
त्यानंतर सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी आपलं उपोषण सोडलं. पण दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनावर ठाम होती. जोपर्यंत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत देशभरात आंदोलन थांबणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर अखेर आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपण राजीनामा दिल्याची घोषणा केली.
कॉकरोच जनता पार्टीने यांनी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यासाठी आजच अल्टिमेटम दिलं होतं. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्या देण्यापूर्वी जंतरमंतरवर संसर मार्गावर दगडफेक करण्यात आली. जंतरमंतरवर आंदोलन आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर एकच गोंधळ झाला. पोलिसांनी अश्रू धुराचा वापर करावा लागला. तेवढ्याच दिल्लीतून मोठी बातमी समोर आली की, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.
धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पत्रात काय लिहिलंय?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताना सोशल मीडियावर एक पत्र शेअर केलं आहे. या पत्रामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिलंय की, मी चार दशकांहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित आहे. माझा नेहमीच विश्वास राहिला आहे की एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही एका सशक्त राष्ट्राचा पाया आहे. मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो, असे प्रधान म्हणाले. तसंच भारताच्या तरुण पिढीची स्वप्ने साकार करणे ही आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक नैतिक वचनबद्धता राहिली आहे. पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो.


