Homeमहाराष्ट्रकागदी नोटांऐवजी येणार आता पॉलिमर नोटा; जाणून घ्या नक्की काय आहेत पॉलिमर...

कागदी नोटांऐवजी येणार आता पॉलिमर नोटा; जाणून घ्या नक्की काय आहेत पॉलिमर नोटा?

गेल्या काही दिवसांमध्ये प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार असल्याची चर्चा होती. त्या चर्चा आता सत्य ठरताना दिसत आहेत.वित्त मंत्रालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) फील्ड ट्रायलसाठी (चाचणीसाठी) १० आणि २० रुपयांच्या प्रत्येकी एक अब्ज पॉलिमर बँक नोटा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

 

भारतीय हवामानात या नोटा किती टिकतात आणि गुणवत्ता कशी राहते, याचे मूल्यमापन करण्यासाठी आरबीआयने या नोटा चाचणी तत्त्वावर सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

 

सरकारच्या उत्तरानुसार, या फील्ड चाचण्या यशस्वी ठरल्या तरच त्यांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्याचा विचार केला जाईल.आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी गेल्या महिन्यात पॉलिमर बँक नोटांचा विचार सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र, ही प्रक्रिया अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पॉलिमर नोटा नक्की काय आहेत?

◼️ पॉलिमर नोटा या विशेष प्रकारच्या टिकाऊ प्लास्टिकच्या पदार्थापासून तयार केल्या जातात.

◼️ या नोटा सामान्य कागदी नोटांच्या तुलनेत अधिक मजबूत असतात.

◼️ उष्णता, पाऊस, आर्द्रता, धूळ आणि वारंवार वापरामुळे लवकर खराब होत नाहीत.

◼️ तसेच त्यामध्ये अधिक प्रगत सुरक्षेमुळे बनावट नोटा तयार करणे अधिक कठीण होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -