Homeकोल्हापूरकोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

कोल्हापुरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका बंद असलेल्या घरामध्ये जिलेटिनचा स्फोट झालाय. एवढंच नाही तर परिसरातून तब्बल दहा ते बारा स्फोट झाल्याची माहिती येतेय.

 

त्यामुळे आजूबाजूचे नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु झालाय.

 

मागील वर्षभरापासून बंद असलेल्या एका घरात स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती कळताच पोलिस दाखल झाले. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल, डीवायएसपी आप्पासाहेब पवार, करवीरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर दाखल झाले आहेत.

 

बंद घरात झालेल्या स्फोटासह परिसरात जवळपास दहा ते बारा स्फोटाचे आवाज झाल्याची नागरिकांची माहिती आहे. हे स्फोट नेमके कुणी आणि का केले? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -