Homeमहाराष्ट्रजेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात, शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरवर गुन्हा...

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात, शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

राज्यातील विविध जिल्ह्यात आज अपघाताच्या (Accident) अनेक घटना घडल्या आहेत. तर, पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव (jejuri) रस्त्यावर देखील आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.

 

शिवाई बस (Bus) आणि दुचाकीच्या धडकेत नाझरे येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. महेंद्र नाझीरकर आणि रेश्मा नाझीरकर असं मृत दाम्पत्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शिवाई बसच्या धडकेत झालेल्या दुर्घटनेत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी-मोरगाव मार्गावर सकाळी आठच्या सुमारास शिवाई बस आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील नाझरे येथील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. मात्र, जागेरच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. मात्र, याप्रकरणी बस ड्रायव्हरवर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

महिला गंभीर जखमी

 

मुंबईच्या दहिसर पूर्वेतही अपघाताची घटना घडली असून दहिसर पोलीस स्टेशनजवळ मानव कल्याण हॉस्पिटल सिग्नलवर भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरने महिलेला चिराडले. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी, दहिसर पोलिसांकडून गुन्हा दाखल करुन आरोपी डंपर चालकाचा शोध सुरू आहे.

 

मुंब्य्रात कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

 

मुंब्रा-ठाणे मार्गावरील रेतीबंदर रोड येथे कंटेनर आणि दुचाकीच्या धडकेत 18 वर्षीय अरिस कुरेशी आणि इरफान अन्सारी यांचा मृत्यू झाला. काल रात्री 11.42 वाजता ही दुर्घटना घडली. या अपघातनंतर कंटेनरचालक पसार असून मुंब्रा पोलीस तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -