‘अमॅझॉन’सोबत काम करून मिळवा 50 ते 60 हजार पगार; कामासाठी निवडू शकता आपल्या आवडीचा वेळईकॉमर्समधील दिग्गज कंपनी अॅमेझॉन इंडिया लोकांना पैसे कमविण्याची संधी देत आहे. आपण देखील वेळेचे बंधन नसलेली नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी ही सर्वोत्कृष्ट संधी आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काम करून महिन्याला 55,000 ते 60,000 रूपये कमवू शकता. कसे ते जाणून घेऊया.


Amazon भारतात आपला व्यवसाय वाढवत आहे. यासाठी उत्पादनांच्या वितरणाची वेळ कमी करणे ही सर्वात महत्वाची बाब आहे. त्यामुळेच सध्या कंपनी जवळजवळ प्रत्येक शहरात डिलिव्हरी बॉय शोधत आहे. यात ग्राहकांचे पॅकेज गोदामातून उचलून त्यांच्या घरी पाठवावे लागते. आपण हे काम करू इच्छित असल्यास आपण आपल्या जवळच्या Amazonच्या गोदामाशी संपर्क साधू शकता.

कंपनीनुसार एका डिलिव्हरी बॉयला एका दिवसात 100 ते 150 पॅकेज वितरित करावे लागतात. हे सर्व वेअरहाऊसपासून 10 किंवा 15 किलोमीटरच्या परिघातील असतात. त्यामुळे हे काम 4 ते 5 तासांमध्ये सहज पूर्ण होते आणि उर्वरित आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्पादनांचे वितरण सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या आवडीच्या टाईम स्लॉटमध्ये हे काम करू शकता.

Leave a Reply

Join our WhatsApp group