बहिणीची छेड काढल्या मुळे तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

नागपुरमधील कपिल नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून दोन भावंडांनी एका तरुणाची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावंडांना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव कमलेश असून त्याने काही दिवसांपूर्वी आरोपींच्या बहिणीची छेड काढली होती.


काही दिवसांपूर्वी मृतक कमलेश याने एका मुलीची छेड काढली होती. या प्रकरणी पीडित तरुणीने कपिल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कमलेश याला पोलिसांनी अटक सुद्धा केली होती. नुकताच कमलेश हा जामिनावर बाहेर आला होता. आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून संतप्त झालेल्या दोन भावंडांनी बुधवारी रात्री कमलेशला गाठून त्याची धारधार शस्त्राने हत्या केली.


या प्रकरणात आरोपी उज्वल आणि दीपक यांना त्यांच्याकाही नातेवाईकांनी मदत केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी उज्वल आणि दीपक या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. या दोघांनी बहिणीची छेड काढल्यामुळे कमलेश याची हत्या केल्याची माहिती समोर येत असली तरी पोलीस या प्रकरणाचा विविध अँगलने तपास करत आहेत.

Leave a Reply

Join our WhatsApp group