Homeमहाराष्ट्रतेल, साखर, कांदा, डाळी, तांदळाचे दर वाढले, दर वाढण्याची प्रमुख कारणे, हे...

तेल, साखर, कांदा, डाळी, तांदळाचे दर वाढले, दर वाढण्याची प्रमुख कारणे, हे दर कधीपर्यंत राहतील?

सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य खरेदीत महागाईचा दर ७.७४ टक्क्यांवर गेला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ज्वारीचे किलोचे दर तब्बल ५० रुपयांनी वाढले आहेत.

 

रोजच्या जेवणातील तांदळानेही उच्चांकी दर गाठला आहे.

 

सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे धान्य, भाजीपाला, इतर शेतमालाची आवक घटली आहे. नाशिकमध्ये ज्वारीचे २७० ते ३०० व्यापारी असून त्यांच्याकडे ज्वारीची आवक थेट ४० टक्क्यांनी कमी झाली आहे.

 

तेलाचे लिटरचे दर असे

 

शेंगदाणा : सध्याचे दर २०५ रुपये, मागील वर्षांचे दर – १८० रुपये

सोयाबीन : सध्याचे दर १५५ रुपये, मागील वर्षांचे दर – १३० रुपये

सनफ्लॉवर : सध्याचे दर १८० रुपये, मागील वर्षांचे दर – १६० रुपये

धान्याचे किलोचे दर असे

 

हरबरा डाळ : ११० रुपये किलो

तूरडाळ : १६० रुपये किलो

मूगदाळ : १३० रुपये किलो

तांदूळ : ८० रुपये किलो

बाजरी : ४५ रुपये किलो

ज्वारी : १२० रुपये किलो

कांदा, साखर आणि खाद्यतेल महागले वर्षभराच्या तुलनेत कांद्याच्या किमतीत सुमारे ११३ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी दिली. साखरेच्या किमतीत सुमारे २२ टक्के, तर सूर्यफूल तेलाच्या किमतीत सुमारे १८ टक्के वाढ झाली आहे.

 

तांदळाचे दर सहा महिने वाढलेलेच कृषी विभागाच्या अंदाजानुसार, यंदा देशातील तांदूळ उत्पादनात सुमारे ७० लाख टनांची घट होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हा तांदूळ उत्पादनात अग्रेसर असून जिल्ह्यातील तांदूळ उत्पादनात यंदा ३० टक्के घट येणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे तांदुळाचे दर पुढील चार ते सहा महिने तर वाढलेलेच असतील, असा अंदाज आहे.

 

महागाई वाढण्याची प्रमुख कारणे अशी पावसाची १९ टक्के तूट नोंदविण्यात आल्याने पिकांचे उत्पादन कमी झाले आहे. त्याचा परिणाम डाळी व इतर अन्नधान्याच्या पुरवठ्यावर झाला असून उत्पादनातील घट आणि बाजारातील पुरवठ्याचा ताण (उदा. कांद्याच्या दरामध्ये होणारी वाढ). पावसातील अनियमितता, लागवडीचे क्षेत्र आणि पीकस्थिती यांचा उत्पादनावर थेट परिणाम झाला असल्याची माहिती व्यापारी मयूर वर्धमान यांनी दिली.

 

पावसाची तुट बाजारातील किमतीवर परिणाम करणारी ठरत असून अन्नधान्य महागाईचा दर ७.७४ ते ८ टक्क्यांवर गेल्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसू शकते. सध्या मागणीत २० टक्के घट असली तरी दिवाळी हा महत्त्वाचा सण असल्याने दिवाळीत मागणीवर फारसा परिणाम होणार नाही, असे वाटते. मात्र ग्राहकाला पैसे जास्त खर्च करावे लागतील. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवणे, बाजारातील दर आणि उपलब्ध साठ्यांवर लक्ष ठेवणे, गरजेनुसार राखीव साठ्यातील वस्तू बाजारात आणणे हा उपाय सरकारने केले तर दर आवाक्यात राहू शकतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -