पत्नीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली १० लाखांची खंडणी


पत्नीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी देवदास बाळासो घारे (रा. जिवबा नाना जाधव पार्क) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संबधित महिलेच्या पतीला घारे याने रस्त्यात अडवून व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या गुन्ह्याची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.

तुझ्या पत्नीचे व्हिडिओ आणि फोटो माझ्याकडे आहेत, त्याकरिता मला दहा लाख रुपये द्या नाहीतर मी ते सगळीकडे पाठवीन. अशी धमकी संशयित देवदास घारे याने 23 ऑगस्ट ला फिर्यादीला अडवून दिली होती. बदनामीच्या भितीपोटी काही दिवस फिर्यादीने ही बाब कोणालाही सांगितली नव्हती.

अखेर त्यांनी करवीर पोलिसांत येवून पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांना हा प्रकार सांगितला. यावरुन संशयित घारेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group