विद्यार्थ्यांच्या आईसोबत झालेल्या वादातून शिक्षकाने केली आत्महत्या…

केरळमध्ये एका शाळेच्या शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने शाळेत मोठी खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या शिक्षकावर काही दिवसांपूर्वी एक हल्ला झाला होता. यानंतर त्याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर या शिक्षकाचा मृतदेह त्यांच्याच घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शिक्षकाचे मित्र आणि त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या चुकीच्या वागणुकीला जबाबदार ठरवलं आहे.



पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षकाने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा दावा कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले कि मृत सुरेश चलियथ यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. शिक्षकाचा त्याच्या शाळेतील विद्यार्थ्याच्या आईसोबत वाद झाला होता. मात्र त्यांनी या प्रकरणात पोलिसात तक्रार केली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.



शिक्षकाच्या मित्राने सांगितली सगळी हकीकत काही लोक गुरुवारी सुरेशच्या घरी आले होते. तेव्हा सुरेश घरी नव्हता. त्यांना फोन करून बोलवण्यात आले. जसा सुरेश घरी पोहोचला, लोकांनी त्याला मारहाण सुरू केली. दरम्यान त्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी ऑनलाईन क्लासदरम्यान एका विद्यार्थ्याच्या आईसोबत सुरेशचा वादविवाद झाला होता. हल्ला करणारे लोक सुरेशला त्या वादाबाबत बोलत होते अशी माहिती सुरेशच्या मित्राने दिली आहे. तसेच तो पुढे म्हणाला, सुरेशला ते लोक जमिनीवरून घसरत खेचत गाडीपर्यंत घेऊन गेले आणि शिक्षकाला निर्जनस्थळी नेवून सोडले. या प्रकरणी सुरेशने पोलिसात तक्रार केली होती, मात्र याबाबत कोणताच गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group