भारताच्या हावामानात विचित्र बदल होत आहेत. मान्सूनचा हंगाम जवळपास संपला असला तरी हवामान विभागाने पुन्हा एकदा इशारा पावसाचा इशारा जारी केला आहे.
हवामान विभागाने 25 ऑक्टोबर रोजी राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट दिल आहे. तर, दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा धोका आहे.
बंगालच्या उपसागरात शक्तिशाली हवामान प्रमणाली सक्रिय झाली आहे. येत्या काही दिवसांत हे चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. हवामान विभागाच्या माहितीनुसार 23 ऑक्टोबरच्या सकाळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. 26 ऑक्टोबरपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
26 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत, त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम-वायव्य दिशेने, उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीकडे सरकेल.
दरम्यान, या पश्चिमी प्रणालीचा वायव्य भारतातील राज्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 25 ऑक्टोबर रोजी देशातील 20 राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, पुदुचेरी, आंध्र प्रदेश आणि सिक्कीम या 20 राज्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ताशी 75 किलोमीटर वेगापर्यंत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
