अण्णाप्पा खामलेहत्ती यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

ताजी बातमी/ऑनलाइन टीम :


संभाजीनगर येथील सामाजिक चळवळचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते श्री अण्णाप्पा मल्लप्पा खामलेहत्ती यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.ना. छगन भुजबळ  यांच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करणेत आली.

सदर निवडीचे पत्र जिल्हा कार्याध्यक्ष श्री दादासाहेब चोपडे यांनी दिले. निवडी वेळी जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती शितल तिवडे,महिला शहर अध्यक्षा सौ स्वाती काळे, लहुजी शिंदे, सुनील मेटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  या निवडीबद्दल श्री अण्णाप्पा खामलेहत्ती यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

निवडीनंतर श्री अण्णाप्पा खामलेहत्ती यांनी आपल्यावर आता आणखीन जबाबदारी वाढली असून ती मी स्वतःला झोकून देऊन पार पाडेन, समता परिषदेच्या कार्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेन असे मत व्यक्त केले.

Leave a Reply

Join our WhatsApp group