Thursday, June 1, 2023
Homeकोल्हापूरअकरावी प्रवेश : ‘कट ऑफ’ वाढण्याची शक्यता

अकरावी प्रवेश : ‘कट ऑफ’ वाढण्याची शक्यता

ताजी बातमी/ऑनलाईन टीम

गेले काही दिवस रेंगाळलेला अकरावी सामायिक प्रवेश प्रक्रिया बाबतचा निर्णय झाल्यानंतर आता अकरावी प्रवेश साठी होणारी सामायिक प्रवेश प्रक्रिया (सीईटी) उच्च न्यायालयाने रद्द ठरविल्याने कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशाचा यंदा ‘कट ऑफ’ तीन ते चार टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

तसे पाहता यंदाच्या वर्षी 90 ते 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी जास्त असल्याने उपलब्ध जागा, अपेक्षित विद्याशाखा, नामांकित महाविद्यालयांत अकरावी प्रवेश साठी चुरस रंगणार आहे.

आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीचे 55 हजार 784 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहरात 35 कनिष्ठ महाविद्यालये असून, 14 हजार 600 अकरावीची प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यातील सुमारे 150 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 45 हजारांहून अधिक प्रवेश जागा आहेत. शैक्षणिक वर्ष 2020 पेक्षा यावर्षीच्या निकालांमध्ये चार टक्क्याने वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गुणांची टक्केवारीदेखील वाढली आहे.

ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या व दुसर्‍या फेरीमध्ये वाढलेल्या गुणांमुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण होणार आहे. वाढलेल्या टक्केवारीमुळे विद्यार्थ्यांना आवडीचे महाविद्यालय, विद्याशाखा मिळण्यास अडचण येऊ शकते.

सामान्यत:, दरवर्षी विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचा कल असतो. शहरातील महाविद्यालयांत विज्ञानच्या तुलनेत वाणिज्य शाखेची प्रवेश क्षमता कमी आहे. त्यामुळे यावर्षी वाणिज्य इंग्रजी व मराठी शाखेच्या प्रवेशासाठी मोठी चुरस असणार आहे.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group