Thursday, June 1, 2023
Homeदेश विदेशउडत्या विमानातून तिघेजण कोसळले.

उडत्या विमानातून तिघेजण कोसळले.

उडत्या विमानातून तिघेजण कोसळले तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तान मधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. तालिबान्यांनी हाहाकार माजवल्यामुळे अफगाणिस्तान येथील लोक देश सोडून पळून जात आहेत. तालिबान्यांच्या दहशतीखाली असलेल्या अनेक लोकांना आपला जीवदेखील गमवावा लागत आहे.


देश सोडून जाण्यासाठी लोकांची धडपड सुरू असून काबूल विमानतळावर लोकांची गर्दी उसळत आहे. याच दरम्यान घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडिओ अल झझिरा या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.


त्यात काबूल विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या एका विमानाच्या टायरला धरून तीन लोक लटकत होते. पण विमानाने उड्डाण घेताच ते तिघेही खाली कोसळले. मात्र, ही घटना कधी आणि कोणत्या विमानाबाबत घडली, याची पुष्टी होऊ शकलेली नाही.
काबूल विमानतळाजवळील स्थानिकांनी दावा केला की तिघेजण विमानाचे टायर धरून लटकत होते. ते लोकांच्या घरांवर कोसळले, अशी माहिती विमानाचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या पत्रकाराने दिली आहे.


अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन लष्कर आणि नाटो फौजांनी एका रात्रीत काढता पाय घेतल्यानंतर हाहाकार उडाला. रक्तपिपासू तालिबान्यांनी महिनाभरात देश काबीज करताना पुन्हा एकदा तालिबानी राजवटीची हाक दिली आहे.
देशातील प्रत्येक जीव संकंटात असताना राष्ट्राध्यक्ष अश्रफ गणी यांनी देश सोडल्याने संतापाची लाट उसळली आहे. तालिबान्यांनी काबूलवर निर्णायक आघाडी घेतल्यानंतर युद्ध समाप्तीची घोषणा केली आहे.


काबूल विमानतळावर गोळीबार झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडले. यात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका व्हिडिओत काबूल विमानतळावरील परिस्थिती भयावह दिसून येत आहे.
तालिबानने अफगाणिस्तानातील बहुतांश शहरांवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घणी देश सोडून पळून गेले आहेत. ते उझबेकिस्तानला गेले असल्याचे समजते.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group