लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. तसेच नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या चारही जागांवरील विद्यमान आमदारांचा कार्यकाळ हा येत्या 7 जुलैला संपपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या चारही जागांसाठी 10 जूनला मतदान पार पडणार आहे. तर 13 जूनला मतमोजणी होणार आहे. मुबंई पदवीधर मतदारसंघावर सध्या विलास पोतनीस हे विद्यमान आमदार आहेत. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघावर निरंजन डावखरे हे विद्यमान आमदार आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघावर किशोरे दराडे हे विद्यमान आमदार आहेत. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील हे विद्यमान आमदार आहेत. या सर्व आमदारांचा विधान परिषदेचा कार्यकाळ हा येत्या 7 जुलै 2024 ला संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल?
या निवडणुकीसाठी 15 मे ला नोटीफिकेशन निघेल. या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मे 2024 असणार आहे. तसेच 24 मे 2024 ला सर्व अर्जांची छाननी होईल. तर 27 मे 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. यानंतर 10 जून 2024 ला मतदान पार पडेल. तर 13 जून 2024 मतमोजणी केली जाईल. 18 जून 2020 पर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.
काही महिन्यांपूर्वी पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली तेव्हा नाशिक आणखी दोन जागांवर महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस बघायला मिळाली होती. नाशिकच्या जागेची चर चांगलीच चर्चा होती. यावरुन काँग्रेसमध्ये धुसफूस बघायला मिळाली होती. आता या निवडणुकीत काय-काय राजकीय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.