बैलगाडी शर्यतीवर लवकरच मार्ग काढू : Jayant Patil



बैलगाडी शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसेल असा मार्ग लवकरच काढू, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंगळवारी दिले. शर्यतीसंदर्भात बैलगाडी मालकांनी ना. पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार शशिकांत शिंदे, निलेश लंके, किसन काथोरे, अनिलराव बाबर, संजय जगताप, संग्राम जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि राज्यातील बैलगाडी मालक आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

ना. पाटील म्हणाले, बैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती आणि आरोग्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे. शर्यतीबाबत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group