Friday, April 19, 2024
Homeआरोग्यकेंद्र सरकारने दिली नवीन वर्षाची भेट; १२७ औषधांच्या किमती केल्या कमी

केंद्र सरकारने दिली नवीन वर्षाची भेट; १२७ औषधांच्या किमती केल्या कमी

केंद्र सरकारने तब्बल १२७ औषधांच्या किमती केल्या आहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या औषधांचे नवीन दर लागू होतील. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.नॅशनल फार्मास्यूटिकल प्रायजिंग अथॉरिटीने १२७ औषधांच्या किमती ठरवल्या आहेत. ताप, सर्दी, खोकला, या सर्वावर गुणकारी अशा पॅरासिटामाॅल गोळीचा यात समावेश करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या घरात या गोळीचे पॅकेट असतेच. कोरोनाकाळात या गोळीची मागणी खूप वाढली. या गोळीची किंमत कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पॅरासिटामॉल (६५०mg), २.३ रुपये प्रति टॅबलेटमध्ये विकले जाते होते. ते आता १.८ रुपये प्रति टॅबलेटमध्ये उपलब्ध होईल. विशेष म्हणजे या वर्षात पॅरासिटमाॅलची किमत दुसऱ्यांदा कमी झाली आहे.

तसेच अमोक्सिसिलिन व पोटॅशियम क्लेव्हुलेनेट हे औषध २२.३ रुपयांनी विकले जात होते. ते आता १६.८ रुपयांना मिळणार आहे. मोक्सीफ्लाॅक्सासिनची किमत ३१.५ रुपयांवरुन २२.८ रुपये करण्यात आली. यासह राबेप्राझोल किमतही कमी करण्यात आली आहे. न्यूमोनियाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतीतही घट करण्यात आली आहे.

नॅशनल फार्मास्यूटिकल प्रायसिंग अथॉरिटीने या वर्षात सलग पाचव्यांदा औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. औषधांच्या किमती करुन मोदी सरकारने सर्वसामान्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. मात्र मधुमेहासाठी वापरल्या औषधाच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. काही अन्य औषधांच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. मधुमेहाच्या मेटफॉर्मिन औषधांची किंमत १.७ रुपयांवरुन १.८ रुपये करण्यात आली आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर मधुमेही रुग्णांच्या खिशावर ताण वाढणार आहे.

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्सने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. संघटनेचे सरचिटणीस राजीव सिंघल म्हणाले की, औषधांच्या किमती कमी करण्याचे केंद्र सरकारचे पाऊल स्वागतार्ह आहे. पण पॅरासिटामॉलसारख्या काही औषधांच्या किमती आधीच कमी झाल्या आहेत. फार्मास्युटिकल घटकांच्या किमती वाढत असताना, उत्पादकांना किमती आणखी कमी करता येणार नाही. याचा औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही अशी आशा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -