सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाशी SRK चा काय संबंध आहे? ‘Pathan’ च्या या स्पेशलची सर्वत्र चर्चा

बॉलिवूडचं किंग शाहरुखच्या ‘पठान’ चित्रपटाने घवघवीत यश मिळवलं आहे. हा चित्रपट तुफान कमाई करतो आहे.त्यानंतर शाहरुख खान सध्या आनंदात आहे. तरदुसरीकडे कियारा अडावाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये या शाही सोहळा होणार आहे. कियारा-सिद्धार्थच्या या खास दिवशी उपस्थित राहण्यासाठी अनेक पाहुणे येणार आहेत, त्यामुळे सुरक्षेबाबत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल किंग खानचं या लग्नाशी खास कनेक्शन आहे.

किंग खानचं काय कनेक्शन?

तर बॉलिवूड सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात सुपरस्टार शाहरुख खान च्या एक्स बॉडीगार्डची सुरक्षा असणार आहे. यासिन खान असं त्यांचं नाव आहे. ते पहिले किंग खानचे बॉडीगार्ड होते. आता त्यांनी स्वत:ची सिक्योरिटी फर्म सुरु केली आहे.

शाही लग्न

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नासाठी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये 84 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. लग्नासाठी पाहुणे आजपासून जैसलमेरला पोहचणार आहे. या पाहुण्यांसाठी मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसह सुमारे 70 कारची व्यवस्था आहे.

Join our WhatsApp group