Friday, March 29, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर बँकेचे पाच कर्मचारी ईडीच्या ताब्यात; हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ

कोल्हापूर बँकेचे पाच कर्मचारी ईडीच्या ताब्यात; हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ

कोल्हापूर जिल्हा बँकेची दोन दिवसांपासून ईडीकडून झाडाझडती सुरू असून इंडीने जिल्हा बँकेतील पाच कर्मचारी ताब्यात घेतले आहेत.कोल्हापूर जिल्हा बँकेची दोन दिवसांपासून ईडीकडून झाडाझडती सुरू असून इंडीने जिल्हा बँकेतील पाच कर्मचारी ताब्यात घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. विशेष म्हणजे ईडीकडून बुधवारी मुश्रीफ यांच्या बँक खात्याशी संबंधित चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून दोन वेळा धाड टाकण्यात आली. गुरुवारीही बँक कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली, त्यानंतर या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कारभाराची चौकशी सुरु असल्यामुळे हसन मुश्रीफ यांची अडचण वाढली आहे. ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला असून मुश्रीफ यांचा बँकेतील काही सहभाग समोर आणण्यासाठीच दोन वेळा छापे टाकण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांचा इशारा

ईडी ही सरकारी यंत्रणा आहे. ते चौकशी करण्यासाठी आले आहेत. आम्ही सगळ्यांनी त्यांना सहकार्य केले, अशी प्रतिक्रिया कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली. या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी मुंबईला नेले जात असल्यामुळे ते तणावात होते. या कर्मचाऱ्यांना कुठलाही धोका निर्माण झाला तर संबंधित अधिकाऱ्यांवर खटला दाखल केल्याशिवाय संघटना थांबणार नाही, इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.

हिशेब द्यावाच लागेल

आता कोल्हापूर जिल्हा बँकांमध्ये ईडीची चौकशी सुरू. अनेक बेनामी खाते, शेतकऱ्यांच्या नावाने बोगस एफडी असेल तर चौकशी होणारच, हसन मुश्रीफ, तुम्हाला हिशोब तर द्यावाच लागणार, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -