Uorfi Javed हिच्या कपड्यांवर रणबीर कपूरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘मला तिची फॅशन.’

अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘तू झुटी मैं मक्कार’ सिनेमामुळे चर्चेत आहे.अभिनेत्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करताना दिसत आहे. सिनेमात रणबीर याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकत आहे. सिनेमातील रणबीर – श्रद्धा यांच्या जोडीला चाहतांनी डोक्यावर घेतलं असताना अभिनेता वेग-वेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहे. आता तर रणबीर याने चक्क मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला आहे.

रणबीर कपूर याने अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या What Women Want या चॅट शोमध्ये अनेक गोष्टींवर मोठा खुसाला केला. शोमध्ये करीनाने अभिनेत्याला अनेक अभिनेत्रींचे फोटो दाखवले. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे करीनाने अभिनेत्रींचे चेहरे दाखवले नाहीत. अभिनेत्रींचे कपडे बघून रणबीरला ती अभिनेत्री कोण आहे? हे ओळखायचं होतं. शिवाय ‘गुड टेस्ट’ आणि ‘बॅड टेस्ट’ याबद्दल सांगायचं होतं.

दरम्यान, करीनाने रणबीरला उर्फीचा फोटो दाखवला आणि विचारलं ही कोण आहे? यावर रणबीर म्हणाला, ‘ही उर्फी आहे का?’ अभिनेता पुढे म्हणाला, ‘अशा प्रकारची फॅशन मला बिलकूल आवडत नाही..’ आणि उर्फीच्या फॅशनचा रणबीर याने बॅड टेस्ट म्हणून उल्लेख केला. सध्या सर्वत्र रणबीरने व्यक्तव्याची चर्चा आहे.

मॉडेल उर्फी जावेद हिच्या फोटो आणि व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. अनेकांनी उर्फीच्या फॅशनचा विरोध केला तर, अनेकांनी तिचं समर्थन केलं. अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री कंगना रनौत आणि मसाबा गुप्ता यांनी देखील उर्फीच्या कपड्यांवर वक्तव्य केलं. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये रणवीर सिंह यांनी उर्फीच्या कपड्यांचा उल्लेख फॅशन आयकॉन म्हणून केला.

अभिनेता रणबीर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेता, सध्या ‘तू झुटी मैं मक्कार’ सिनेमाचं यश अनुभवत आहे. त्यानंतर रणबीर अभिनेत्री रश्मिता मंदाना हिच्यासोबत ‘एनिमल’ सिनेमात दिसणार आहे. सध्या सर्वत्र रणबीर याच्या आगानी सिनेमाची चर्चा आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी २०२२ मध्ये लग्न केलं. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीर यांच्या मुलीचं नाव राहा कपूर असं आहे. पण अद्याप दोघांनी लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. दोघांनी राहासाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Join our WhatsApp group