Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनगौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला 'छप्परफाड' गर्दी!

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला ‘छप्परफाड’ गर्दी!

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या क्रेझची आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे.ज्या ज्या ठिकाणी गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम असतो तिथे मात्र पोलिसांना अधिक काम लागतं. त्याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी. गौतमी जिथेही जाते तिथे तुफ्फान गर्दी होते. हजारो लोक जमतात. त्यात तरुण आणि वयस्क लोकांचाही समावेश असतो. एवढेच नव्हे तर गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी महिलाही मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. गर्दी एवढी होते की बसायलाही जागा राहत नाही. त्यामुळे लोक दाटीवाटीने बसून गौतमीचा कार्यक्रम पाहतात. एवढेच कशाला जागा मिळत नाही म्हणून काही तरूण चक्क झाडावर चढतात. नगरमध्ये तर हद्दच झाली. काही तरुणांनी थेट दुकानाच्या गाळ्यांवरच चढाई केली. त्यामुळे या दुकानाच्या गाळ्याचे छप्परच तुटले.

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील जवळे येथे नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी पार पडला. पैलवान जयदीप सालके आणि सौरव लोखंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम अयोजिय करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या अदाकारींवर ठेका धरला. यावेळी गौतमीच्या अदाकारींवर बेभान होऊन प्रेक्षक नाचले. तर काही प्रेक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामपंचायतीने बांधलेल्या गाळ्यांवरती चढल्याने एका गाळ्यांचे पत्रे फुटले. त्यामुळे गाळेधारकाला मनस्ताप सहन करावा लागला. आता या गाळेधारकाच्या गाळ्याच्या भरपाईची कुणीही दखल घेत नाहीये. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दुकानदाराला मात्र विनाकारण गौतमीच्या अदांचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

दरम्यान, साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा 30 मार्चला वाढदिवस होता. त्यामुळे जावळी तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जावळी तालुक्यातील कुडाळ येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवेंद्रराजे हे सुद्धा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजे यांना स्टेजवर नाचण्याची विनंती केली. त्यामुळे शिवेंद्रराजेही स्टेजवर काहीवेळ स्टेजवर थिरकले. शिवेंद्रराजे यांनी हातवर करून ठेका धरला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रचंड शिट्ट्या वाजवत जल्लोष केला. यावेळी शिवेंद्रराजे यांनी गौतमी पाटील हिचा साडीचोळी देऊन सन्मान केला. यावेळी कार्यक्रमादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांचा पोलिसांनी चांगला समाचार घेऊन सौम्य लाठीचार्ज देखील केलेला पाहायला मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -