Friday, June 2, 2023
HomeमनोरंजनMC Stan ला सानिया मिर्झाकडून मिळाले असे गिफ्ट, आता सोशल मीडियावर होतेय...

MC Stan ला सानिया मिर्झाकडून मिळाले असे गिफ्ट, आता सोशल मीडियावर होतेय त्याचीच चर्चा

बिग बॉस 16 च्या अंतिम फेरीनंतर दिग्दर्शिका फराह खानने मुंबईतील तिच्या घरी आयोजित केलेल्या पार्टीत एमसी स्टॅन आणि सानिया मिर्झा यांची भेट झाली. यावेळी दोघांची ओळख होऊन चांगली मैत्री झाली.त्यानंतर स्टेनने हैदराबादमध्ये सानिया मिर्झाच्या टेनिस रिटायरमेंट बॅशमध्येही परफॉर्म केले होते.

अशातच आता सानियाने प्रसिद्ध रॅपर एम सी स्टॅन महागडे गिफ्ट पाठवले आहेत. ज्यात शूज आणि गॉगलचा समावेश आहे. परंतु सानियाने भेट दिलेल्या या वस्तूंच्या किंमती पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सानियाने स्टॅनला दिलेल्या गिफ्ट्सची एकूण किंमत 1.21 लाख रुपयांच्या घरात आहे. यात नाईकीच्या काळ्या शूजची किंमत 91 हजार रुपये असून गॉगल्सची किंमत 30 हजार रुपये आहे.

एम सी स्टॅनने सानियाकडून गिफ्ट्स मिळाल्यानंतर त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. त्याने सानिया मिर्झाला आपा म्हणजे उर्दू भाषेत मोठी बहीण म्हणून संबोधित करून तिचे आभार मानले.एम सी स्टॅन हा त्याच्या गाण्यांप्रमाणेच त्याची महागड्या लाईफस्टाईलमुळेनेहमीच चर्चेत असतो.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group