Thursday, June 1, 2023
Homeसांगलीसांगली : महाविद्यालयीन युवकाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक

सांगली : महाविद्यालयीन युवकाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक

केवळ रागाने बघत सतत टॉर्चर करून भर रस्त्यात गुरुवार सायंकाळी राजवर्धन रामा पाटील ( वय १८, रा. मतकुणकी) या युवकाचा कोयता आणि चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून काही तासातच संशयित चौघांच्या मुसक्या आवळल्या.

पाच दिवस पोलीस कोठडी
१९ रा. जगदाळे प्लॉट, संजयनगर), शैलेश शामराव हाके (वय १९ रा. संजयनगर), वरद संजय सकट (वय १९ रा. कुपवाड) आणि गौरव उर्फ बंटी विजय चौरे (वय २० रा. साखर कारखाना कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मृत राजवर्धन याचा मामा राजेश रामचंद्र पाटील ( रा. बुधगाव) यांनी संजयनगर फिर्याद दिली आहे. संशयितांना शुक्रवारी न्यायालयापुढे उभे केले असता दि. १८ एप्रिल पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी दिली.

मृत राजवर्धन हा सांगलीतील आयटीआयमध्ये शिक्षण घेतो. तो मूळचा तासगाव तालुक्यातील मतकुणकी येथील रहिवासी
आहे. तो शिक्षणानिमित्त बुधगाव येथील नातेवाईकांकडे राहत होता. महाविद्यालय सुटल्यानंतर तो मित्रांसह कारखाना परिसरातून नित्याने जायचा. कारखाना एसटी थांब्यावर तो दररोज बसने घरी जात होता. संशयित हल्लेखोर आणि राजवर्धन यांच्या दोन दिवसांपासून एकमेकांकडे बघण्यावरून राग होता. त्यातूनच संशयितांनी त्याचा गेम केला.

या खूनप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवून अवघ्या काही तासातच संशयित चौघांना ताब्यात घेऊन जेरबंद केले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. शुक्रवारी त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group