Thursday, June 1, 2023
Homeक्रीडाKKR vs MI Playing 11: रोहित शर्माची पलटन की नितीश राणाचे योद्धा;...

KKR vs MI Playing 11: रोहित शर्माची पलटन की नितीश राणाचे योद्धा; प्लेईंग 11 आणि खेळपट्टीबाबत सर्वकाही जाणून घ्या

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : आज आयपीएलमध्ये रविवारच्या डबल हेडरचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे.

आज आयपीएलमध्ये रविवारच्या डबल हेडरचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर आयपीएल 2023 मधील 22 वा सामना पाहायला मिळणार आहे. 16 एप्रिलला रंगणाऱ्या सामन्यात बई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ मैदानात आमने-सामने येणार आहेत. आयपीएल 16 व्या हंगामातील ही लढत मुंबईच्या घरच्या मैदानावर वानखेडेवर पार पडणार आहे. मुंबई इंडियन्स संघासाठी हा सामना अधिक महत्त्वाचा आहे. कारण संघाचा आयपीएल 2023 मधील तीन पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवू शकला आहे. मुंबई आणि कोलकाता आमने-सामने
सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या 16 व्या मोसमात मुंबई आणि कोलकाता एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून पहिला विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने या विजयासह आपलं खातं उघडलं. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन सध्या नवव्या स्थानावर असून सध्या मुंबईची पलटन विजयी घोडदौडीसाठी सज्ज झाली आहे.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group