Friday, June 2, 2023
Homeकोल्हापूरकोल्हापूर : फुटबॉल मैदानात हुल्लडबाजी; खेळाडू पंचांच्या अंगावर धावले

कोल्हापूर : फुटबॉल मैदानात हुल्लडबाजी; खेळाडू पंचांच्या अंगावर धावले

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर, : छत्रपती शाहू स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीतील संघांच्या समर्थकांनी हुल्लडबाजी केली. मैदानात फटाके, बाटल्या व चपला फेकल्या. त्यातच दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भिडले तसेच पंचांच्याही अंगावर गेले. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करून हुल्लडबाजांना पांगवले. यामुळे चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याला गालबोट लागले.

श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ या संघात झाला. या दोन संघातील सामने तुल्यबळ असल्याने ते पाहण्यासाठी मैदान गर्दीने खचाखच भरून जाते.

संघाच्या समर्थकांकडून प्रचंड गोंधळ सुरू होता. यामुळे तणावाचे वातावरण होते. पोलिस बंदोबस्तातही हुल्लडबाजी सुरू होती. सामन्याच्या उत्तरार्धात पंचांच्या निर्णयांवर अक्षेप घेत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. तर दोन्ही संघातील काही खेळाडू एकेमकांना अर्वाच्य शिवीगाळ करत अंगावर गेले. अखेर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group