Friday, March 29, 2024
Homeराजकीय घडामोडीनव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; ट्विट करत म्हणाले की….

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; ट्विट करत म्हणाले की….

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर राज ठाआज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचे लोकार्पण पार पडले. संसदेचे उदघाटन मोदींनी करावं कि राष्ट्रपतींनी करावं यावरून नव्या वादाला तोंड फुटले. यावरून देशभरातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी या उदघाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला. तर काही जणांनी सरकारच्या समर्थनार्थ उपस्थिती लावली. या एकूण सर्व घडामोडीदरम्यान, आता मनसेने आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत सरकारच अभिनंदन केलं आहे.

आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे. ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन भारतीय लोकशाही चिरायू होवो …. असं ट्विट राज ठाकरेंनी(Raj Thakre) केलं.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसद भवनाचं उद्घाटन झालं. धार्मिक विधी करत नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी गणपती होम देखील करण्यात आला. तसेच यावेळी नरेंद्र मोदींनी ‘सत्ता हस्तांतरण चं प्रतीक’ सेंगोल म्हणजेच राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला स्थापित केला. सर्व धर्मीयांच्या प्रथा परंपरांप्रमाणे पूजा करत सेंगोलची स्थापना करण्यात आली. यावेळी मोदी सेंगोलसमोर नतमस्तक झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -