ऋषभ पंतची हाफ सेंच्युरी, लंचपर्यंत भारताकडे 143 धावांची आघाडी

ताजी बातमी ऑनलाईन टीम


केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) मालिकेतील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना सुरु आहे. केपटाऊन कसोटी (Capetown test) जिंकणारा संघ मालिकाविजेता ठरणार आहे. सध्या दोन्ही संघांना समान संधी आहे. भारताला काल पहिल्या डावात 13 धावांची निसटती आघाडी मिळाली आहे. भारताचा पहिला डाव 223 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 210 धावात गुंडाळला. आज विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा पुढे डावाला सुरुवात करतील.

सध्या दोन्ही संघ मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहेत. सेंच्युरियनची पहिली कसोटी भारताने तर जोहान्सबर्गची कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. मागच्या सात दक्षिण आफ्रिका दौऱ्यांमध्ये भारतीय संघाला एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. केपटाऊन कसोटी जिंकून 29 वर्षांपासूनचा मालिका विजयाचा दुष्काळ संपवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, ऋद्धिमान साहा, जयंत यादव, प्रियांक पांचाल, उमेश यादव, हनुमा विहारी आणि इशांत शर्मा.

दक्षिण अफ्रीका: डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा, कगिसो रबाडा, सरेल इरवी, ब्युरेन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी निगीडी, एडेन मार्कराम, वियान मुल्डर, कीगन पीटरसन, रासी वान डर डुसे , काइल वेरेने, मार्को यानसन, ग्लेनटन स्टुरमैन, प्रेनेलन सुब्रायेन, सिसांडा मगाला, रेयान रिकेल्टन, डुआने ओलिवियर.

Open chat
Join our WhatsApp group