सांगली : दुबईतील बँकेकडून कर्ज देण्याच्या आमिषाने पोल्ट्री व्यावसायिकाला ९२ लाखांचा गंडा

दुबईतील बँकेकडून 21 कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने येथील पोल्ट्री व्यावसायिकाला 92 लाख 68 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याबाबत डॉ. दत्तात्रय दुबे यांनी सांगलीतील दोघांसह आठजणांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये योगेश जावळे, प्रमोद देशपांडे (दोघे रा. विश्रामबाग, सांगली), दिनेश देसाई, प्रवीण कुर्डूवार, भारत भूषण परांजपे, प्रवीणचंद्र मणीलाल शहा (सर्व रा. अहमदाबाद), डॉ. अलशरीफ, महंमद सरावत (दोघे रा. दुबई) यांचा समावेश आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मिरजेतील डॉ. दत्तात्रय दुबे यांचा सोलापूर येथे पोल्ट्रीफार्म आहे. त्यांनी व्यवसाय विस्तारासाठी परदेशी बँकेकडून कमी व्याजाने कर्ज मिळविण्यासाठी सांगलीतील योगेश जावळे व प्रमोद देशपांडे यांच्याशी संपर्क साधला होता.
त्यांनी अहमदाबाद येथील दिनेश देसाई, प्रवीण शहा यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. त्यानंतर दुबईतील रॅकिया इन्व्हेस्टमेंट अ‍ॅथॉरिटीमार्फत 21 कोटी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. डॉ. दुबे यांनी स्थानिक बँकेकडून कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करून रिझर्व्ह बँकेकडे पाठविले. तेथून लोन रजिस्टर क्रमांकासह कर्जाचा प्रस्ताव दुबईतील अलशरीफ व महंमद सरावत या मध्यस्थाकडे पाठविण्यात आला.

Join our WhatsApp group