Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राकडे 24 लाखांहून अधिक कोरोना डोसचा साठा

महाराष्ट्राकडे 24 लाखांहून अधिक कोरोना डोसचा साठा

एकीकडे देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असतानाच देशात लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. अशात मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र सरकार लस उपलब्धतेत कमतरता असल्यामुळे लसीकरणाची गती वाढवू शकत नसल्याचे बोलले जात होते. पण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या वृत्ताचे खंडन केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की महाराष्ट्र सरकारकडे कोव्हॅक्सिन लसीचा 24 लाखांहून अधिक डोसचा साठा आहे. त्याचबरोबर राज्याला शुक्रवारी अतिरिक्त 6.35 लाख डोस मिळाल्याचे केंद्राने म्हटले आहे.

मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, कोविन अ‍ॅपवर उपलब्ध साप्ताहिक लसीकरणाच्या आकडेवारीनुसार, 18 वर्षांखाली अल्पवयीन मुलामुलींच्या लसीकरणासाठी राज्याला कव्हर करण्यासाठी आणि बूस्टर डोससाठी महाराष्ट्राचा कोव्हॅक्सिन लसीचा सरासरी वापर दररोज सुमारे 2.94 लाख डोस एवढा आहे. राज्याकडे कोव्हॅक्सिन लसीचा आतापर्यंत न वापरलेल्या 24 लाखांहून अधिक डोसचा साठा आहे. त्यामुळे, राज्याकडे 10 दिवसांच्या लसीकरणासाठीचा लसीचे मुबलक डोस आहेत.
मंत्रालयाने त्यापुढे म्हटले आहे की, याशिवाय, कोव्हिशिल्डसाठी, महाराष्ट्राला आजपर्यंत मिळालेल्या साठ्यामधील 1.24 कोटी शिल्लक डोस उपलब्ध आहेत. कोव्हिशिल्डच्या लसीचा दररोज सरासरी वापर 3.57 लाख एवढा आहे. हा साठा 30 दिवसांपेक्षा जास्त काळ लसीकरणासाठी पुरेसा असल्याचे म्हणाल्यामुळे मीडिया रिपोर्ट्सने दिलेली माहिती चुकीची असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -