Friday, March 29, 2024
Homenewsमथुरा नगरीत मांस व मद्य विक्रीवर बंदी; योगी आदित्यनाथ यांची घोषणा...

मथुरा नगरीत मांस व मद्य विक्रीवर बंदी; योगी आदित्यनाथ यांची घोषणा…


मथुरा नगरीतील वृंदावन, गोवर्धन, नंदगाव, बरसाना, गोकूळ, महावन आणि बलदेव या सात शहरांमध्ये मांस आणि मद्य विक्री बंदी चे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहेत. या व्यसायातील लोकांचे अन्यत्र पुनर्वसन करण्याचे आदेशही दिले आहेत.

सोमवारी, श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी मथुरा नगरीत मांस, मद्य बंदी करण्याबाबत घाोषणा केली.
यावेळी, त्यांनी मथुरेत श्रीकृष्ण जन्मस्थळाचेही दर्शन घेतले. या दरम्यान त्यांनी रामलीला मैदानावर आयोजित एका सभेला संबोधित केले.
चार वर्षांपूर्वी २०१७ साली स्थानिक जनतेच्या मागणीनुसार, मथुरा आणि वंदावन नगरपालिकांची नगरपरिषद झाली आहे.
येथे सात राजकीय रुपात तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या पवित्र स्थळांवर मद्य आणि मांसाची विक्री केली जाऊ नये, अशी अशी जनतेची अपेक्षा आहे.
त्यामुळे जनतेच्या मनाप्रमाणेच होईल, असं मी आश्वासन देतो. या संदर्भात पुढील कारवाई करा, असे आदेशही दिले आहेत.

पुनर्वसन होणार
मांस आणि मद्य विक्रीच्या व्यवसायाशी जे लोक निगडीत आहेत, त्यांच्यासाठी दुग्धपालनाच्या व्यवसायात संधी देऊ, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
केवळ पवित्र स्थळांची वाटचाल करण्यासाठी आणि व्यवस्थित पुनर्वसन करणं हाच यामागचा उद्देश आहे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रामलल्लाचं दर्शन घेणारे रामनाथ कोविंद हे देशाचे पहिले राष्ट्रपती आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत.
मोदीजींच्या नेतृत्वात नव्या भारतात अनेक परिवर्तन होताना दिसून येत आहेत.
यामुळे जे लोक अगोदर मंदिरात जाण्यासाठीही संकोच करत होते. ते लोक आता राम आणि कृष्णही आमचेच आहेत.
हे परिवर्तन आहे, आता यासाठी स्पर्धा लागली आहे.’

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -